Adil Khan | राखी सावंतसोबतचे माझे लग्न बेकायदेशीर होते, दुसऱ्या लग्नानंतर आदिल खानने सोडले मौन

Adil Khan On Marriage With Rakhi Sawant | राखी सावंत चा पूर्व पती आदिल खानने 3 मार्च रोजी ‘बिग बॉस 12’ फेम सोमी खानसोबत लग्न केले. आपल्या लग्नादरम्यान आदिलला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून त्याने सोमीसोबतचे आपले नाते मीडियापासून लपवून ठेवले. अलीकडेच, ETimes TV सोबतच्या एका खास संभाषणात आदिलने त्याच्या नवीन आणि जुन्या दोन्ही लग्नांबद्दल मोकळेपणाने सांगितले आणि राखी सावंतसोबतचे त्याचे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावाही केला.

सोमी खानसोबतच्या लग्नाकडे ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणून पाहिले जाऊ शकते, असे आदिलचे (Adil Khan) मत आहे. पण प्रत्यक्षात त्याने सोमी खानशी मनापासून लग्न केले आहे. आदिलला आता राखी सावंतसोबत आपला भूतकाळ मागे सोडायचा आहे, कारण राखी कोणाच्याही आयुष्यात आनंद आणू शकत नाही यावर त्याचा विश्वास आहे. यादरम्यान राखीवर टीका करताना आदिलने असेही म्हटले की, तिने नेहमीच त्.ाच्याबद्दल नकारात्मकता पसरवली आहे.

आदिलचा मोठा खुलासा
आपल्या आणि राखीच्या लग्नाबद्दल बोलताना आदिल म्हणाला, “जर राखी सावंतसोबत माझ्या लग्नाविषयी चर्चा होत असेल, तर त्याबद्दल मला एकच सांगायचे आहे की, हे लग्न बेकायदेशीर आहे, कारण जेव्हा आमचे लग्न झाले तेव्हा राखीचे लग्न झाले होते. त्या वेळी तिने माझी फसवणूक केली होती. याबाबत सध्या न्यायालयात खटला सुरू आहे. आणि मुद्दा असा आहे की मी दुसरे लग्न कसे केले? त्यामुळे मला पुनर्विवाह करण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण मी मुस्लिम आहे. माझ्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत मी औपचारिकपणे लग्न केले. मी कुणाशीही कुटुंबाशिवाय, बंद खोलीत लग्न केलेले नाही. मी सोमी आणि माझ्या कुटुंबीयांच्या मान्यतेने हुंडा दिला आहे. मी रिसेप्शन पण केले. सोमीशी अधिकृतपणे लग्न केल्यानंतरच मी आता माझ्या पत्नीसोबत फिरत आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार