Rakhi Sawant | पूर्व पतिच्या दुसऱ्या लग्नामुळे तुटले राखीचे हृदय, पोस्ट करत सांगितल्या मनातील भावना

Rakhi Sawant ON Ex Husband Marriage: आपल्या असामान्य स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेणारी राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. वास्तविक, राखीचा पूर्व पती आदिल खानने (Adil Khan) सोमीसोबत दुसरे लग्न केले आहे, ज्यामुळे केवळ आदिल आणि सोमीच नाही तर राखी देखील चर्चेत आली आहे. त्याचवेळी, जेव्हापासून आदिल खानच्या दुसऱ्या लग्नाची बातमी आली तेव्हापासून राखी तिच्या इन्स्टाग्रामवर सतत पोस्ट करत आहे, पण राखी जे पोस्ट करत आहे ते खूप भावूक आहे.

आदिलच्या दुस-या लग्नानंतर राखी इंस्टाग्रामवर ज्या पोस्ट शेअर करत आहे, त्यात ती खूप दुःखी दिसत आहेत. राखीची पोस्ट पाहून यूजर्स असा अंदाज लावत आहेत की आदिलच्या दुसऱ्या लग्नाचा राखीच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे आणि यामुळे तिचे हृद्य तुटले आहे. आदिलच्या दुसऱ्या लग्नावर राखीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी तिच्या ताज्या पोस्टमधून तिचे दुःख दिसून येते.

नुकतीच राखीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले की, मला स्वतःचा अभिमान आहे. मी प्रत्येक प्रकारच्या वेदनांचा सामना केला आहे, मग ते कुटुंबाशी संबंधित असो, विश्वास असो, हृदय तुटणे असो किंवा नैराश्य असो. मी एकटीने ते सहन केले, पण हार मानली नाही. राखीची ही पोस्ट पाहून ती खूप दु:खी असून स्वतःचे सांत्वन करत असल्याचे दिसते. या पोस्टवर यूजर्स राखीचे सांत्वन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर