Vasant More | वसंत मोरेंचं अखेर ठरलं! आज या बड्या नेत्याची भेट घेणार

Vasant More To Meet Sharad Pawar | वसंत मोरे यांनी मनसेतून राजीनामा दिल्यानंतर त्यांना इतर पक्षांकडून धडाधड ऑफर्स आल्या. त्यामुळे वसंत मोरे कोणत्या पक्षात जाणार याच्या चर्चा रंगल्या मात्र दोन दिवसांत मी सगळं जाहीर करेन असं ते राजीनामा देताना म्हणाले. त्यातच आता वसंत मोरे (Vasant More) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज शरद पवार पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी वसंत मोरे हे शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.

वसंत मोरे यांना शरद पवारांकडून संपर्क झाला होता.काल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे डॉक्टर सेलच्या अध्यक्षांनी वसंत मोरे यांची भेट घेतली होती. आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात वसंत मोरे हे शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर वसंत मोरे नेमका कोणता निर्णय घेतील, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार