हे वागणं बरं नव्हे! सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला नाना पाटेकरांनी जोरात डोक्यात मारलं

Nana Patekar Slaps Fan: चित्रपट अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या कणखर वृत्तीसाठी ओळखले जातात. काशीमध्ये जर्नी या चित्रपटाचे शूटिंग करत असलेल्या नाना पाटेकर यांचा हा लूक दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाला होता. शितळा घाटाजवळ ते शूटिंग करत होते. घाटाच्या वरच्या भागात रस्त्यांचे शॉट्स घेतले जात होते. दरम्यान, सेल्फी घेण्यासाठी एक किशोरवयीन तरुण मोबाईल कॅमेरा चालू करून नानांजवळ आला. मात्र नानांनी त्याच्यासोबत असे कृत्य केले, ज्यामुळे त्याच्यावर भरपूर टीका होत आहे.

एक तरुण चाहता शूटिंगसाठी उभा असलेल्या नानांजवळ जातो आणि मोबाईल घेऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला पाहताच नाना चिडतात आणि त्याच्या डोक्यात जोरात चापट मारतात. यामुळे चाहता अवाक होतो आणि लगेच क्रू मेंबर्स त्याला पकडून बाहेर काढतात. असाच काहीसा प्रकार इंटरनेट मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…