माझ्या नादाला लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन; नारायण राणेंचा अजित पवारांना दम

पुणे- पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी चिंचवडमध्ये नाना काटे (Nana Kate) यांच्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार फटकेबाजी केली. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. सर्व पडले की नाही? राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात पडले. दुसऱ्यांदा वांद्रे की कुठे तरी पडले. हा. तिथे पडले. तिथे तर महिलेने पाडलं. बाईनं पाडलं. बाईंन. ही त्यांची प्रत्येकाची काय परिस्थिती आहे, असा टोला अजित पवारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर लगावला.

यावरून आता नारायण राणे यांनी अजित पवारांचे पुण्यात येऊन बारा वाजवीन असा इशारा दिला (Narayan Rane On Ajit Pawar) आहे. आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे.

अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळत मला माहित नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. मी सलग सहा वेळा निवडून आलो आहे. महिला असेल पुरुष असेल उमेदवार हा उमेदवार असतो. अजित पवारांनी बारामतीच्या बाहेर जाऊन बारसे घालायचे बंद करावे. माझ्या नादाला लागू नका नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे.