आपलं ट्विटर अकाऊंट वाचवता आलं नाही, ते देश काय वाचवणार?

सोशल मिडियावरील अकाऊंट हँक होणे आता काही नवीन राहिले नाही. रोज कित्येक अकाऊंट हँक होतात. काल मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाऊंट काही काळापुरते हँक झाले होते. अकाऊंट हँक झाले खरे पण त्यावरून एक महत्वाची घोषणा देखील करण्यात आली. भारतात बीटकॉईनला अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. आता सरकारने 500 बीटकॉईन्स खरेदी केले आहेत,आणि ते देशातील नागरिकांना वाटली जाणार आहेत. असं या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

यावरून विरोधकांनी मात्र मोदी यांचा चांगला समाचार घेतला आहे. ज्यांना स्वताच ट्विटर अकाऊंट वाचविता आलं नाही ते देश काय वाचवणार असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे. काल रात्री 2 वाजून 11 मिनिटांनी मोदी यांचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. बीटकॉइन्सच्या ट्विट नंतर एकच गोंधळ उडाला. तब्बल एक तासानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत खुलासा करण्यात आला. मागील वर्षी देखील मोदी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. मोदीचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यावरून जर काही चुकीचे ट्विट केले गेले असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्यात यावे असे पंतप्रधान कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे.