नरेंद्र मोदी यांनी गेल्या 50 वर्षात न होऊ शकलेली कामे 9 वर्षात पूर्ण केली – Eknath Shinde

सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असणे गरजेचे

Eknath Shinde :- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तेलंगणा राज्याला या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करायचे असेल तर भाजप हाच पर्याय निवडावा लागेल असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे बोलताना केले. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार पायल शंकर आणि एस. कुमार यांच्या प्रचारासाठी तेलंगणा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांशी संवाद साधला. राज्यात आणि केंद्रात एकाच विचारांचे सरकार असल्यास राज्याचा विकास जलदगतीने होतो, महाराष्ट्र हे त्याचे उत्तम उदाहरण असून केंद्राच्या सहकार्याने महाराष्ट्रात अनेक विकासप्रकल्प वेगाने सुरु आहेत, त्यामुळे तेलंगणाचा सर्वांगीण विकास करायचा असल्यास भाजपच्या उमेदवारांना मतदान करावे असे आवाहन शिंदे यांनी केले.

आदिलाबाद येथे भाजप उमेदवार पायल शंकर यांच्यासाठी आदिलाबाद आणि बेला आशा दोन्ही ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रभारफेरी काढली यावेळी स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यावेळी हजारो नागरिक रस्त्यावर उतरून त्याना पाहण्यासाठी जमले होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गेल्या 50 वर्षात न होऊ शकलेली कामे 9 वर्षात पूर्ण केली असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कृषी सन्मान योजना राबवणे असो, शेतकऱ्यांचे पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात जमा करणे असो, महिला भगिनीना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून दिलासा देणे असो, त्यांच्यासाठी महिला आरक्षण लागू करणे असो किंवा कोरोना काळाप्रमाणे देशातील गरीब वर्गाला पुढील 5 वर्षे मोफत रेशन देणे असो असे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्यामुळे मोदींच्या भाजपला मत देणे म्हणजे पूर्ण होणाऱ्या अश्वासनाना मतदान करण्यासारखे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थान निवडणुकीच्या प्रचार काळात दहा दिवसांत कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली होती पण 5 वर्षे झाली तरीही ती पूर्ण झाली नाही. तर कर्नाटकात निवडणूक जिंकण्यासाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले गेले मात्र नंतर कर्जमुक्ती करण्यासाठी पैसे नाहीत असे उत्तर काँग्रेसने दिले. बीआरएसच्या कालखंडात राज्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढला आहे. राज्यातील नागरिकांवर आज साडे सात लाख करोड रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले.

धर्मपुरी येथील भाजप उमेदवार एस. कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी यंदा तेलंगणामध्ये हिंदुत्वाचा जोर दिसत असल्याचे सांगितले. अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असून येत्या 22 जानेवारी रोजी त्याचे लोकार्पण होणार आहे. काही लोकानी त्यांच्यावर ‘मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे’ म्हणून टीका केली पण आता मंदिरही बनले आणि तारीखही जाहीर झाली त्यामुळे टीकाकारांची तोंडे बंद झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रात शिवसेना भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवून देखील नंतर स्वार्थासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यात आली. मात्र बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचे विचार टिकवण्यासाठी आम्ही ती चूक दुरुस्त केली. केंद्र आणि राज्य यांचा समन्वयातून महाराष्ट्रात आज अनेक विकास प्रकल्प वेगाने पुढे गेले असून राज्याचा सर्वांगीण विकास करायचा तर महाराष्ट्रप्रमाणे तेलंगणामध्येही डबल इंजिन सरकार अस्तित्वात आणावे असे आवाहन मतदारांना केले.

मोदी यांना पराभूत करण्यासाठी ‘इंडी’ आघाडी तयार करून बीआरएस सहित सर्व पक्ष एकवटले आहेत मात्र मोदींचा भारत त्याना पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. ‘टीआरएस’ पक्षाचे नाव बदलून ‘बीआरएस’ करण्यात आले असले, तरीही आता त्याना ‘व्हीआरएस’ देऊन त्यांचे चिन्ह असलेली गाडी कायमची भंगारात काढायची वेळ आली असल्याचे मत व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा

जाणून घ्या OnePlus 12 भारतात कधी लॉन्च होणार ?