मराठा समाजासाठी चांगली बातमी, ‘या’ भागात सापडल्या 3500 कुणबी नोंदी

Maratha Reservation मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातल्या ‘आंतरवाली सराटी’ इथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी काल नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं काल ‘आंतरवाली सराटी’ इथं जाऊन जरांगे यांच्याशी यशस्वी चर्चा केली. त्यानंतर सरकारला येत्या दोन जानेवारीपर्यंत मुदत देत जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. आपण आमरण उपोषण मागे घेत असून साखळी उपोषण मात्र सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचे आभार मानले.

दरम्यान, मराठा समाज कुणबी आहे की नाही? याबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी सरकारने समिती बनवली आहे. न्यामूर्ती संदीप शिंदे (Sandeep Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून सध्या मराठा समाजच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरु आहे. शिंदे समितीच्या शोध मोहिमेत मराठवाड्यात आणखी 3500 नोंदी सापडल्याची माहिती आहे. मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी 15 हजारावर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, 25 हजारापर्यंत नोंदी सापडण्याचा शिंदे समितीला अंदाज आहे. 25 हजार नोंदीतून 25 लाख मराठा समाजाला प्रमाणपत्र देणे शक्य आहे. शिंदे समितीतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिलीय. शिंदे समितीची कुणबी नोंदींची शोध मोहीम सुरूच आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही भागात मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी सापडल्या आहेत.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे