शुटिंगदरम्यान अभिनेत्रीचा सुटला तोल, सीन संपल्यानंतरही इमरान हाश्मीला किसच करत राहिली

इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा असा अभिनेता आहे, जो संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जातो. इमरान हाश्मीला हे नाव मिळाले कारण त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या सहकलाकाराचे चुंबन घेतले आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याचे चाहते फक्त एकच सीन बघायला जायचे आणि चित्रपटही हिट व्हायचे. पण अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेत्रीने त्याचे चुंबन घेतल्यावर (Kissing Scene) तो खूपच आश्चर्यचकित झाला होता.

इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी (Nargis Fakhari) अभिनीत अझहर सिनेमाचे गाणे बोल दो ना जराच्या शूटिंगदरम्यान एक भन्नाट किस्सा घडला होता. या गाण्यादरम्यान नर्गिस फाखरीचा तोल सुटला आणि दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतर नर्गिस इमरानला किस करत राहिली आणि त्यानंतर संपूर्ण युनिट जोरात हसायला लागले.

अझहर हा चित्रपट भारतीय क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन आणि संगीता बिजलानी यांच्या कथेवर बनवण्यात आला होता. या चित्रपटात ‘बोल दो ना जरा’ हे एक गाणे देखील होते जे आजही लोकांच्या हृदयात घर करून आहे. याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये किसिंग सीनचे शूटिंग दाखवण्यात आले आहे. दिग्दर्शकाला सीन समजावून सांगताना, नर्गिस इमरानच्या गळ्यात हात घालून पोझिशन सेट करताना दिसते आणि नंतर इमरान हाश्मी ‘अगर नहीं हुआ तो हम करते रहे है’ असे गंमतीने म्हणताना दिसतो.

इमरान हाश्मी आणि नर्गिस फाखरी यांचा किसिंग सीन शूट करण्यात आला आहे. सीन छान शूट झाला. पण दिग्दर्शकाने कट म्हणूनही नर्गिस इमरानला किस करताना दिसली, त्यानंतर नर्गिसची लिपस्टिक इमरानच्या ओठांवर लागते आणि अभिनेता लाजून लालबुंद होतो.