कोहलीशी पंगा घेणाऱ्या खेळाडूचा आश्चर्यकारक निर्णय, वयाच्या 24 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा

Naveen Ul Haq Retirement: अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन उल हकने (Naveen Ul Haq) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, तो २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून (ODI Cricket) निवृत्त होणार आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन नवीनने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, तो ODI मधून निवृत्त होत आहे. मात्र टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानकडून खेळत राहीन. नवीन आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहलीशी संघर्ष करून प्रसिद्धीझोतात आला होता.

बुधवारी संध्याकाळी नवीनने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीबद्दल सांगितले. नवीनने लिहिले की, “माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. या विश्वचषकानंतर मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईन. मात्र, मी माझ्या देशासाठी टी-२० क्रिकेट खेळत राहीन. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नाही, पण माझी क्रीडा कारकीर्द लांबणीवर टाकण्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला. मी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानू इच्छितो आणि माझ्या सर्व चाहत्यांचे समर्थन आणि अतूट प्रेमाबद्दल आभार मानतो.

नवीन अवघ्या 24 वर्षांचा असून त्याने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत 14 विकेट घेतल्या आहेत. नवीनची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे एका सामन्यात 42 धावांत 4 विकेट घेणे. त्याने 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 बळी घेतले आहेत. त्याने 8 आयपीएल सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. नवीन हा लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू आहे. आयपीएलच्या मागील आवृत्तीत विराट कोहलीसोबत झालेल्या संघर्षामुळे तो खूप लोकप्रिय झाला होता.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश