सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने इतर पदाधिकार्‍यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या...

Sanjivraje Naik Nimbalkar – संजीवराजे नाईक निंबाळकर यांची राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या मान्यतेने सातारा जिल्हाध्यक्षपदी आज नियुक्ती करण्यात आली.

आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील अनेक जिल्हयातील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

संजीवराजे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव अधिक बळकट करण्यासाठी निश्चित सहकार्य करतील असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मान्यतेने विष्णूपंत म्हैसधुणे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस युवकच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सारांश भावसार आणि प्रदेश सरचिटणीस पदी मयूर बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.youtube.com/watch?v=sStgV_m3FeE

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला