समीर भुजबळ यांच्यावर अजित पवारांनी सोपवली महत्वाची जबाबदारी; ‘या’ महत्वाच्या पदावर केली यांची नियुक्ती

Sameer Bhujbal – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) स्थापनेत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे मोठे योगदान आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या सर्व कामाची जबाबदारी बॅकस्टेजला राहून समीर भुजबळ यांनी पार पाडली. आज मुंबई अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली असून या पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची नियुक्ती आज करण्यात आली. मुंबईतील गरवारे क्लब हाऊस येथे झालेल्या मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.

मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड झाली ही अतिशय आनंदाची बाब आहे. समीर भुजबळ यांनी खासदार म्हणून अतिशय उत्तमरीत्या आपली जबाबदारी पार पाडली आहे. विकासाची अनेक कामे त्यांनी नाशिकमध्ये केली. त्यांना मुंबई शहराचे देखील बारकावे माहित आहे. गेल्या २५ वर्षात अनेक प्रसंगामध्ये एक व्हिजन घेऊन काम करून यशस्वी जबाबदारी त्यांनी पार पाडली. त्यांच्या रूपाने पक्षाकडे एक व्हिजन असलेले, अनुभवी युवा नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. मुंबई शहरात अधिक लक्ष देऊन मुंबईत क्रांती घडविण्याचे काम त्यांच्याकडून होईल. त्यांच्याकडून मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या कार्यात मंत्री छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. मुंबई शहराला समीर भुजबळ यांच्या सारख्या कुशल नेतृत्वाची गरज होती. मुंबईत पक्षाचे जाळे वाढवण्यासाठी समीर भुजबळ हे यशस्वीपणे काम करतील. मुंबई शहराकडे आजवर पक्षाकडून दुर्लक्ष झाले. आगामी काळात मुंबईचा गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. नाशिकप्रमाणे मुंबई शहराचा समीर भुजबळ यांचा गाढा अभ्यास असून त्यांची काम करण्याची क्षमता असल्याने मुंबईची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. नाशिकप्रमाणे मुंबईला देखील काम करावं असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले.

मुंबई शहराला सचिन अहिर आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी अतिशय चांगले काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या कार्यकाळात समीर भुजबळ यांनी पक्षाचे चिन्ह, झेंडा नोंदणी, बैठका, सभा यासह महत्वाची कामे पार पाडली आहे. पक्षाने समीर भुजबळ यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ती पक्षवाढीसाठी यशस्वीपणे पार पाडतील. त्यांना आपल्याला सर्वांनी अधिक बळ द्यावे लागेल असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

मुंबई शहरात समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक उभारी देतील असा विश्वासही छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. समीर भुजबळ यांच्या नेतत्वाखाली मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा मानाचे पान तयार केल्याशिवाय राहणार नाही असेही छगन भुजबळ म्हणाले.

नाशिक लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधित्व करत असताना समीर भुजबळ यांनी अनेक महत्वाची विकासाची कामे केली. नाशिक विमानतळ, बोट क्लब यासह विविध उत्तम विकासकामे त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसला प्रदीर्घ काळ त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले. प्रदीर्घ काळ काम करण्याचा त्यांना अनुभव असून त्यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपवत असल्याची घोषणा सुनिल तटकरे यांनी यावेळी केली.

तसेच लवकरच त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रांतातील कार्यकारिणी निर्माण करण्यात येऊन त्यांच्या संघटन कौशल्याचा पक्षाच्या वाढीस अधिक फायदा होईल असेही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपण पक्षात कार्यरत असून अनेक महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. पक्षाने खासदारकीची संधी दिली. नाशिकच्या सर्वसामान्य जनतेची सेवेची संधी मिळाल्यानंतर नाशिकच्या विकासासाठी आपण प्रयत्न केले. मुंबई हे राज्यातील महत्वाचे शहर आहे. या शहरातच माझी जडणघडण झाली आहे. त्यामुळे या शहराच्या प्रमुख पदाची जबाबदारी मिळाली आहे. आपण ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट करू असे आश्वासन समीर भुजबळ यांनी दिले.

यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,माजी आमदार पंकज भुजबळ,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे,शिवाजीराव नलावडे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, सुनीता शिंदे, सिद्धार्थ कांबळे, ॲड रविंद्र पगार, मुकेश गांधी,अर्शद सिद्दीकी,संतोष धुवाळी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश