Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न

Shivsena :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तीन माजी नगरसेवकानी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यात जोगेश्वरीमधील प्रभाग क्रमांक 73 चे माजी नगरसेवक प्रवीण शिंदे, वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील माजी नगरसेविका प्रतिमा खोपडे आणि प्रभाग क्रमांक 88 च्या माजी नगरसेविका स्नेहल शिंदे यांचा यात समावेश होता.

त्यांच्यासह जोगेश्वरी, वर्सोवा आणि विलेपार्ले विभागातील 100 हुन अधिक पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या वृत्तीमुळे तसेच त्यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना शिंदे यांनीमुंबईत आतापर्यंत उबाठा गटाच्या 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असून आता ही संख्या 36 झाली असल्याचे सांगितले.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत अनेक विकासकामे वेगाने सुरू झाली असून त्यामुळे या आंतरराष्ट्रीय शहराला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याचे सांगितले. मुंबईतील रखडलेल्या इमारतींचा पूर्णविकासाला गती देऊन मुंबईतून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत घेऊन येणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

मुंबईतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून हे शहर पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पाऊस थांबल्यानंतर सिमेंट रस्ते करण्याच्या कामाला गती येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे येत्या दोन ते अडीच वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याचे सांगितले. सरकारच्या निर्णयक्षमतेकडे आकर्षित होऊन फक्त मुंबईच नव्हे तर संपूर्णमहाराष्ट्रातून अनेक जण शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत असल्याचे सांगितले.

आज माझ्या वर्षा या निवासस्थानी अनेक देशांचे राजदूत गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मुंबईत सध्या सुरू असलेल्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले.

आज ज्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याना त्यांच्या प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी नक्की विकसनिधी देण्यात येईल लोकांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधीची कमतरता जाणवणार नाही असेही यावेळी स्पष्ट केले.

https://www.youtube.com/watch?v=sStgV_m3FeE

महत्त्वाच्या बातम्या-
शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ नियोजित वेळेतच सायंकाळी विसर्जन मिरवणुकीत होणार सहभागी

भाईजानचा थाटच न्यारा! गळ्यात भगवं उपरणं टाकून पोहचला CM शिंदेंच्या घरी गणरायाच्या दर्शनाला

मध्य प्रदेशात 3 केंद्रीय मंत्र्यांसह 7 खासदारांना तिकीट देऊन भाजपने दिला मोठा संदेश