बारावी इतिहासाच्या पुस्तकातून मुघल साम्राज्याशी संबंधित धडे डिलीट, दहावी अभ्यासक्रमातही बदल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गोवा, त्रिपुरा, दिल्ली, गुजरात, हरियाणा आणि मिझोराम यासह देशातील सुमारे 23 राज्यांच्या शालेय शिक्षण मंडळांचे इयत्ता 10वी 11वी आणि 12वीचे विद्यार्थी आता नवीन इतिहासाची पुस्तके वाचणार आहेत. या करोडो विद्यार्थ्यांना यापुढे मुघल साम्राज्य, दिल्ली दरबार, अकबरनामा, बादशाहनामा आणि अनेक राजकीय पक्षांच्या उदयाच्या कथा इयत्ता 10वी, 11वी आणि 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत.

अभ्यासक्रमात अनेक मोठे बदल करण्यात आले
नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने इयत्ता 10वी, 11वी आणि 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकांचा अभ्यासक्रम सुधारित केला आहे. यामध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीने इयत्ता 10वी, 11वी, 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून राजे आणि त्यांच्या इतिहासाशी संबंधित प्रकरणे आणि विषय काढून टाकले आहेत.

बदल या वर्षापासून लागू
हा बदल शैक्षणिक सत्र 2023-24 पासून लागू होणार आहे. अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, NCERT ने ‘किंग्स अँड क्रॉनिकल्स; मुघल दरबार (16वे आणि 17वे शतक)’ ‘थीम ऑफ इंडियन हिस्ट्री-भाग II’ या इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले आहे.

नागरिकशास्त्राच्या अभ्यासक्रमातही बदल
इतिहासासोबतच NCERT ने नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रमही बदलला आहे. ‘अमेरिकन हेजेमनी इन वर्ल्ड पॉलिटिक्स’ आणि ‘द कोल्ड वॉर एरा’ यासारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, बारावीच्या ‘इंडियन पॉलिटिक्स आफ्टर इंडिपेंडन्स’ या पाठ्यपुस्तकातून ‘राइज ऑफ पॉप्युलर मूव्हमेंट्स’ आणि ‘एरा ऑफ वन-पार्टी डोमिनेन्स’ हे प्रकरण वगळण्यात आले आहेत.

दहावीच्या अभ्यासक्रमात बदल
बारावी सोबतच NCERT ने दहावी आणि अकरावीची काही पुस्तके देखील काढून टाकली आहेत. ‘थीम इन वर्ल्ड हिस्ट्री’ या इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून ‘सेंट्रल इस्लामिक लँड्स’, ‘क्लॅश ऑफ कल्चर’ आणि ‘इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन’ यांसारखे धडे काढून टाकण्यात आले आहेत. यासोबतच इयत्ता दहावीच्या ‘डेमोक्रॅटिक पॉलिटिक्स-II’ या पाठ्यपुस्तकातून ‘लोकशाही आणि विविधता’, ‘लोकप्रिय संघर्ष आणि चळवळी’, ‘लोकशाहीची आव्हाने’ हे प्रकरण काढून टाकण्यात आले आहेत.