LokSabha Election 2024 | मनसे जर शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असेल तर मनसेच्या अस्तित्वाचे काय होणार?

LokSabha Election 2024 | महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंबरोबर अमित ठाकरेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election 2024) राज ठाकरे महायुतीत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या भेटीने विरोधकांमध्ये दहशतीचे वातावरण असून विरोधी पक्षातील नेते हे भाजप आणि मनसेवर टीका करत आहेत तसेच काहीजण हि यीती होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांची देखील प्रतिक्रिया आली आहे.

मराठी माणसाचं कंबरडे मोडण्याचे पाप अदृश्य शक्ती करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी भाजपवर केलाय…मनसे धनुष्यबाणावर जर लढणार असेल तर हे धोकादायक आहे…मनसे हा मराठी माणसाचं अस्तित्व असलेला पक्ष आहे…मनसे जर शिवसेनेच्या चिन्हावर लढणार असेल तर मनसेच्या अस्तित्वाचे काय होणार?…मनसेनं स्वत:च्याच चिन्हावर लढावं, त्यांनी पक्ष सोडू नये असा सल्ला सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना दिलाय…

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर, पुण्यात धंगेकर तर कोल्हापूरातून या नावाला पसंती

LokSabha Election 2024 | ‘अजितदादा जे बोलले ते पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते’

Jitendra Awad | माझ्या डोळ्यात साहेबांसंदर्भात आदर आणि प्रेम असल्याने मनातून अश्रू येतात