मधुकर पिचड यांचा धुव्वा, 28 वर्षाच्या सत्तेला सुरुंग; अकोलेतील अगस्ती साखर कारखान्यावर राष्ट्रवादीचा झेंडा

मुंबई – माजी मंत्री आणि भाजप (BJP) नेते मधुकर पिचड (Madhukar Pichad) आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्या पॅनेलचा धुव्वा उडवत राष्ट्रवादीने अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर घवघवीत यश मिळविले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

अकोले (Akole) तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची (Agasti Sugar Factory) निवडणूक झाली असून या निवडणुकीत कारखान्याचे उपाध्यक्ष सिताराम गायकर, कैलास वाकचौरे, अशोकराव भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने २१ – ० ने पिचड पॅनेलचा धुव्वा उडवला. जवळपास २८ वर्षे मधुकरराव पिचड यांची एकहाती सत्ता असलेल्या या कारखान्यावर राष्ट्रवादीने बहुमताने सत्ता स्थापन केली आहे. अकोले तालुक्यातील जनतेने पिचड यांचे पॅनल शंभर टक्के नाकारले असून हा विजय राष्ट्रवादीचा… हा विजय पवारसाहेबांच्या विचारांचा असल्याचे महेश तपासे म्हणाले.