टीम इंडियाने रहाणेवर पु्न्हा टाकला विश्वास, वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दिली ‘ही’ जबाबदारी

वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India Tour Of West Indies) १२ ते २४ जुलैदरम्यान होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. टीम इंडियामध्ये दोन नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर एका वरिष्ठ खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अजिंक्य रहाणेला संघात कायम ठेवण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्याच्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे.

भारतीय संघात एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला असून मोठी बाब म्हणजे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि उमेश यादव यांना वगळण्यात आले आहे. अनकॅप्ड खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि यशस्वी जयस्वाल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याच्याशिवाय या संघात मुकेश कुमारच्या नावाचाही समावेश आहे.

वेस्टइंडिजविरुद्धचा भारतीय कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, पटेल, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.