संजय राऊतांसाठी पवारांच्या राष्ट्रवादीची ईडी कार्यालयाबाहेर आंदोलनाची हाक

मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आली आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांना आज  न्यायालयात हजर केले जाईल, जिथे एजन्सी त्याची कोठडी मागणार आहे. त्याच्या अटकेपूर्वी, ईडीने राऊतच्या भांडुप निवासस्थानाची नऊ तासांहून अधिक काळ झडती घेतली आणि नंतर मग मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

दरम्यान, एका बाजूला हे सर्व घडत असताना आता स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांना धमकावल्याप्रकरणी देखील संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस ठाण्याच (Vakola Police Station) राऊतांवर गुन्हा दाखल झाला. स्वप्ना पाटकर यांनी धमकावल्याची तक्रार केली होती. त्यावर शनिवारी राऊतांवर एनसी (NC) दाखल करण्यात आली होती. मात्र किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी काल पोलीस ठाण्यात धाव घेऊन एफआयआर (FIR) दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर राऊतांवर 504 आणि 509 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आली.

दरम्यान, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) खासदार संजय राऊत यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेच्या निषेधार्थ सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने ईडीच्या (ED) कार्यालयाबाहेरील वातावरण तापण्याची शक्यता आहे. ईडीने ही शक्यता लक्षात घेऊनच कालपासूनच कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेडस लावून नाकांबदी केली होती. तसेच याठिकाणी सीआरपीएफच्या (CRPF) जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.