‘पवार काका-पुतण्याच्या गाठीभेटीमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात तर भाजपचे कार्यकर्तेही अस्वस्थ’

Pune – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे मुकुंद किर्दत यांनी टीका केली आहे. शरद पवार आणि अजीत पवार यांच्या गाठीभेटीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये संभ्रम आणी भाजप कार्यकर्त्यांचा मनात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. या पक्षांचे स्पष्टीकरण काहीही असो, या ‘ दोन्ही डगरीवर हात ठेवण्याच्या ‘ सत्तेच्या राजकारणामुळे मतदारांचे मात्र डोळे उघडले आहेत. नुकतेच कॅग च्या अहवालात भाजपच्या मोदी सरकारवर ताशेरे ओढले गेले आहेत. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटी च्या भ्रष्टाचाराचा आरोप भाजपनेच केला आहे. परंतु सत्तेसाठीच्या राजकारणामुळे ते एकत्र आले आहेत. जनता हे सर्व सजगपणे पाहते आहे. असं म्हणत भाजपा आणि राष्ट्रवादीला किर्दत यांनी फटकारले आहे.