‘नवाब मलिक तुम आगे बढो…’; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची ईडी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी 

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि ईडीवर सैरभैर झाल्याप्रमाणे टीका करू लागले आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दरम्यान, मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले आहेत. नवाब मलिक तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवाब मलिकांची चौकशी सुरु झाल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आम्हाला खात्री होती की नवाब मलिकांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल, याची कल्पना होतीच अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी नवाब मलिकांच्या चौकशीबद्दल केली आहे. जे जाहीरपणे आपली भूमिका घेते त्यांना त्रास दिला जातो. कोणत्या प्रकरणात मलिकांची चौकशी सुरू आहे हेही माहिती नाही. काहीही झाले तरी दाऊदचे नाव घ्यायचे आणि नोटीस पाठवायचे असे प्रकार सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.