Loksabha Election 2024 : भाजपची ताकत वाढली; आणखी एका पक्षाचा एनडीए प्रवेश

Loksabha Election 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा यूपीमध्ये एनडीएमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यानंतर महायुतीत सहभागी होण्याची घोषणा करण्यात आली आहे.

अमित शाह यांनी ट्विट करून म्हटले- ओम प्रकाश यांनी राजभर यांची दिल्लीत भेट घेतली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो. राजभरजींच्या येण्याने उत्तर प्रदेशातील NDA बळकट होईल आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली NDA कडून गरीब आणि दलितांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल. अमित शहा यांनी ट्विट करून राजभर यांच्यासोबतच्या भेटीचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला असून एनडीए परिवारात आपले स्वागत आहे, असे लिहिले आहे.