राष्ट्रपुरुषांच्या अपमान करणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या विरोधात महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गदारोळ

पुणे – १९ डिसेंबर रोजी पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तसेच महापालिकेत नव्याने बसवलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा येत आहेत. या कार्यक्रमाची जाहिरात म्हणून सत्ताधारी भाजपने संपूर्ण शहरभरात मोठे मोठे होर्डिंग लावले.  दरम्यान, आता या होर्डिंग्जवर कुठेही छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय जनता पार्टीने लावले नाही असे समोर आले आहे.  त्याऐवजी भाजपच्या नेत्यांचे मोठे मोठे फोटोज या बॅनर वरती लावलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महापुरुषांचा अपमान करणाऱ्या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचा पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष श्री प्रशांत जगताप म्हणाले की, ‘या प्रकारातून भाजपचा खरा चेहरा डोळ्यासमोर आला आहे. भारतीय जनता पार्टीला महापुरुषांची आठवण केवळ मत  मागताना येते. भाजपच्या नेत्यांच्या मनात या महापुरुषांबद्दल आदत नसल्याचे या प्रकारातून उघड झाले आहे. त्यांची करणी आणि कथनी यात असलेला फरक् यातून दिसून येतो’.

यावेळी ‘भारतीय जनता पार्टी चा धिक्कार असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या घोषणांनी सभागृह दणाणून निघाले.