महिला बचत गटासाठी सुवर्ण संधी; कुक्कुट पालन व्यवसायासाठी मिळणार भरघोस अनुदान

लातूर :- सन-2020-2021 मधील वार्षिक योजना अंतर्गत कॅलिफार्निया केजच्या माध्यमातुन अंडी उत्पादनास चालना देणे नाविण्यपूर्ण योजना (सर्वसाधारण) जिल्हयामध्ये राबविण्यात येणार आहे. या योजनेतून 120 महिला बचत गटांना 14 ते 16 आठवडे वयाचे BV 380/ BV300 या जातीचे 50 मादी पक्षी कॅलिफार्निया पध्दतीचा पिंजरा व त्यासाठी लागणारे एक महिण्याचे खाद्य यासाठी अनुदान दिले जाणार आहे.सदरील योजना प्रति महिला बाचत गट 75 टक्के रु. 22 हजार 500 व 25 टक्के रु. 7 हजार 500 लाभार्थी हिस्सा असे योजनेच स्वरुप आहे.

ही योजना सर्वसाधारण असून सर्व महिला बचत गटासाठी खुली आहे. छोटया प्रमाणात अंडी उत्पादनातुन कुक्कुट पालन करणाऱ्या  महिला बचत गटांना उत्पन्नाचे साधन निर्माण करणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. जिल्हयातील 10 ही तालूक्यातून या योजनेसाठी महिला बचत गटाकडुन अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रे संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स / किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपलब्ध् करुन घ्यावेत.

पुर्णपणे भरलेले विहित नमुण्यातील अर्ज दि. 17 डिसेंबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत संबंधित पशुधन विकास अधिकारी (वि) पं.स/ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा करावेत. लाभार्थींची निवड पात्र अर्जामधून सोडत पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 1 जानेवारी 2022 नंतर प्राप्त होणाऱ्या किंवा अपुर्ण अर्जाचा निवडीच्या सोडतीसाठी विचार केला जाणार नाही. तरी जास्तीत जास्त संख्येने लातूर जिल्हयतील इच्छुक महिला बचत गटांनी अर्ज करावेत असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद डॉ. आर.डी. पडीले यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.