भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेस मारहाण प्रकरणी पुण्यात राष्ट्रवादीचे मूक आंदोलन

पुणे – केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. स्मृती इराणी यांच्या बालगंधर्व रंगमंदिरातील (Balgandharva Theater) कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे (NCP leader Vaishali Nagwade) यांना मारहाण करण्यात आली असा आरोप होत आहे.

दरम्यान, आता मारहाण  केल्याचा आरोप असणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांविरोधात (Against BJP) गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांवर डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Stataion) मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या माहिलांना भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर चौकात महाविकास आघाडीकडून मुक आंदोलन (Silent movement from Mahavikas Aghadi) करण्यात आले. या मूक आंदोलनात वैशाली नागवडे देखील सहभागी झाल्या होत्या.तर यावेळी कोणताही अनुचित घटना घडू नये,त्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.