‘समाजवादी पक्षाच्या राजवटीत ब्राह्मण समाजावर जेवढे अत्याचार झाले, तेवढे आजपर्यंत कधीही झालेले नाहीत’

लखनौ – उत्तर प्रदेश सरकारचे कायदा मंत्री ब्रजेश पाठक यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षावर ब्राह्मणांची नाराजी असल्याचा आरोप खोडून काढत समाजवादी पक्षाच्या राजवटीत ब्राह्मणांची जेवढी दडपशाही झाली, तेवढी आजपर्यंत कोणत्याही सरकारमध्ये झाली नसल्याचा आरोप केला आहे.

येत्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने ब्रजेश पाठक यांना ब्राह्मण चेहरा म्हणून पुढे केले असून ते सातत्याने सक्रिय आहेत. भाजपवर ब्राह्मणांची नाराजी असल्याच्या प्रश्नावर पाठक बुधवारी ‘पीटीआयशी खास बातचीत करताना म्हणाले, ‘सत्तेवर येण्यासाठी उत्सुक असलेले काही लोकच असे गैरसमज निर्माण करत आहेत, तर आमचे सरकार सर्वच घटकांचे रक्षण करत आहे. ब्राह्मण समाज पूर्णपणे भाजपसोबत आहे.ते म्हणाले, ‘कुठेही घटना घडली तरी आम्ही उघडपणे ब्राह्मण समाजाच्या समर्थनार्थ काम केले आहे.

समाजवादी पक्षाच्या राजवटीत ब्राह्मण समाजावर जेवढे अत्याचार झाले, तेवढे आजपर्यंत कोणत्याही सरकारमध्ये झालेले नाही, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. समाजवादी पक्षाच्या सरकारचा मूळ घटक ब्राह्मणविरोधी राहिला आहे असं ते म्हणाले.

कायदामंत्री असताना तुम्ही माफियांविरोधात काय केले, याच्या उत्तरात ते म्हणाले, ‘आम्ही यूपीमधील सर्व संघटित माफिया टोळ्यांचा नायनाट केला आहे, त्यांचे नेटवर्क संपवले आहे आणि मी दाव्याने सांगू शकतो की सध्या यूपीमध्ये कोणतीही संघटित गुन्हेगारी टोळी कार्यरत नाही. .महाराष्ट्राच्या धर्तीवर येथे UPCOCA (UP Control of Organized Crime Act) कायदा का होऊ शकला नाही, या प्रश्नावर? पाठक म्हणाले की, राज्य सरकार सुरुवातीला UPCOCA कायदा आणण्याच्या बाजूने होते, परंतु उत्तर प्रदेशात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. ते पुढे म्हणाले, परंतु आम्ही यूपीमध्ये अधिक कठोर कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा कायदा (RASUKA) अंतर्गत आम्ही 600 हून अधिक लोकांवर कारवाई केली आहे. 4000 हून अधिक जणांवर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.उत्तर प्रदेशात भाजपने कधीही ब्राह्मणाला मुख्यमंत्री बनवले नसल्याच्या प्रश्नावर पाठक म्हणाले, भाजप कोणत्याही जाती धर्माच्या आधारावर निर्णय घेत नाही. ते कार्यकर्त्याच्या आधारावर निर्णय घेते आणि वेळ आल्यावर संसदीय व्यासपीठावर निर्णय घेऊन चांगले काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी दिली जाते. कोण काय, कोणती जबाबदारी घेणार हे सर्व कार्यकर्ते मिळून पक्षाच्या व्यासपीठावर ठरवतात असे ते म्हणाले.