BREAKING : ‘चलो अयोध्या’ राज ठाकरेंनी तारखेसह केली मोठी घोषणा

पुणे – हिंदुत्वाचा (Hindutva) आवाज बुलंद करणारे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press confrance)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला (Ayodhya) जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

‘आम्हाला कुठली ही दंगल नको.  देशभरातल्या हिंदू बांधवांनी तयार रहा. जर 3 तारखेला समजलं नाही तर या देशातल्या न्यायव्यवस्था कायदा या पेक्षा भोंगा मोठा वाटत असेल तर तसचं उत्तर द्यावं लागेल, भोंग्याचा मुस्लीमांना सुद्धा त्रास होतोय. देशभरातल्या लोकांना एवढंच सांगणं आहे हा भोंग्याचा विषय धार्मिक नाही सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले.