LokSabha Election 2024 | लोकसभेला उमेदवारी न मिळाल्याने विष प्राशन केलेल्या खासदाराचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ

LokSabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीपूर्वी एमडीएमकेला मोठा झटका बसला आहे. एमडीएमकेचे खासदार ए गणेशमूर्ती यांचे निधन झाले आहे. तिकीट न मिळाल्याने खासदाराने रविवारी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. अखेर आज त्यांचे आज निधन झाले.

त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, 74 वर्षीय गणेशमूर्ती यांनी कीटकनाशक सेवन केले होते आणि ते आयसीयूमध्ये होते. त्यांनी आत्महत्येसाठी पाण्यासोबत कीटकनाशक ‘सल्फा’चे सेवन केले होते.

सीएम स्टॅलिन यांच्या मुलाला तिकीट मिळाले
ए गणेशमूर्ती म्हणाले होते की, पक्षाने त्यांच्या जागी डीएमकेचे युवा नेते के ई प्रकाश यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे, जे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्या जवळचे मानले जातात. तिकीट न मिळाल्याने गणेशमूर्ती प्रचंड तणावाखाली असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत, (LokSabha Election 2024) त्यांनी त्यांचे जवळचे AIADMK प्रतिस्पर्धी जी. मनीमारन यांचा पराभव केला आणि 2,10,618 मतांच्या फरकाने जागा जिंकली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?