जर मी सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल; करुणा शर्मा यांचा धनंजय मुंडे यांना इशारा

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांच्याविरोधात करुणा शर्मा (karuna Sharma) यांनी यापूर्वीही अनेक गंभीर आरोप केले आहेत.  धनंजय मुंडेंचे इतरही अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खुलासा करुणा शर्मा पत्रकार परिषदेत केला आहे. तसंच आपण जर सीडी काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असं खळबळजनक विधानही त्यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी खंडणीचा आरोप करुन माझ्या बहिणीला तुरुंगात डांबले असल्याचा आरोप करुणा यांनी केला आहे. करुणा शर्मा आणि त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मागील वर्षभरापासून धनजंय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. एका पत्रकार परिषदेत रेणू शर्मा धनजंय मुंडेबाबत मोठा खुलासा करणार होती. मात्र, त्यापूर्वीच तिला पोलिसांनी खोट्या आरोपाखाली अटक केली असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

माझी एकच मागणी आहे त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून हाकलावे. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेल्या आरोपांचे पुरावे लवकरच माझी बहिण देईल. तसंच मी मुंडेवरील बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे. माझा बहिणीला मुली प्रमाणे संभाळण्याची ग्वाही देत होते. मात्र, मुलीसोबत असे गैरकृत्य केले. तसंच आपण सीबीआयकडे चौकशीची मागणी केली असल्याचंही करुणा शर्मा यांनी यावेळी सांगितलं.