Nikhil Wagle Car Attack | निखील वागळे हे स्वतंत्र विचारांचे पुरोगामी पत्रकार-Jayant Patil

Nikhil Wagle Car Attack : भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Lalkrishna Advani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagle) हे भाजपाच्या रडारवर आहेत. अशातच आता काल संध्याकाळी निखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला (Nikhil Wagle Car Attack) झाला आहे. काही संतप्त कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक आणि अंडी फेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचे आता पडसाद उमटत असून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ‘निर्भय बनो’ हा संविधानवादी नागरिकांचा समूह असून घटनात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी हा समूह वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असतो. याच सभेसाठी आज जेष्ठ पत्रकार निखिल वागळे जात असताना पुण्यातील काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांना मदत मागूनही पोलीसांनी यावेळी कोणतीही मदत केली नाही. गाडीवर दगड, शाई व अंडी फेकण्यात आली असून हा हल्ला पूर्वनियोजित होता. हे सरकार दाभोलकर, पानसरे यांच्याबाबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती होण्याची वाट बघत आहे.

निखील वागळे हे स्वतंत्र विचारांचे पुरोगामी पत्रकार असून त्यांनी अनेकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अगदी वंचित आघाडीच्या नेत्यांवरही प्रखर शब्दांत टीका केली आहे, मात्र त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्याचा विचारही आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनाला शिवला नाही. मात्र सरकारच्या विरोधात काहीही बोलले की समोरच्या व्यक्तीवर हल्ला करुन तो विचार संपवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असतो.

महत्वाच्या बातम्या : 

Nikhil Wagle | पुण्यात निखील वागळेंवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकाराची गाडी फोडली

मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा असून सत्तासंघर्षातून महाराष्ट्राच्या हिताकडे दुर्लक्ष होत आहे

Nana Patole | महाराष्ट्रात गुंडाराज, सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करा