Rajendra Sonar यांची शिव कामगार सेनेच्या प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती

पुणे – राजेंद्र सोनार (Rajendra Sonar) यांची शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) प्रणीत शिव कामगार सेनेच्या प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेना भवन सारसबाग येथील मुख्य कार्यालयात शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती मा.ना.डॉ.नीलमताई गोऱ्हे (Neelamtai Gorhe) यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.या प्रसंगी शिव कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर (Sudhir Kurumkar), व अन्य मान्यवर उपस्थित होते.

राजेंद्र सोनार (Rajendra Sonar) हे मुक्त पत्रकार असून गेली ३३ वर्ष प्रसिद्धी क्षेत्रांत कार्यरत आहेत. आगामी काळात कामगारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने कार्य करून शिव कामगार सेनेचे कार्य समाजाच्या तळागाळात पोचविणार असल्याचे राजेंद्र सोनार यांनी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ