आफताब सारख्या लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे – निलेश राणे

नवी दिल्ली –  लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचा आरोपी आफताब अमीन पूनावालाची चौकशी आणि पॉलीग्राफ चाचणीनंतर धक्कादायक माहिती सातत्याने समोर येत आहे. चौकशीदरम्यान त्याने प्रथमच धक्कादायक खुलासा केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याने म्हटले आहे की, श्रद्धाच्या हत्येप्रकरणी त्याला फाशी झाली तरी त्याला त्याचा पश्चाताप होणार नाही, तो स्वर्गात गेल्यावर त्याला अप्सरा मिळतील.  इतकंच नाही तर श्रद्धासोबतच्या रिलेशनशिपदरम्यान 20 हून अधिक हिंदू मुलींशी त्याचे संबंध असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना दिलेल्या जबानीतून आफताबची धर्मांध मानसिकता समोर आली आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. श्रद्धा वालकरला ठार मारणारा आरोपी आफताबने पॉलीग्राफ टेस्टमध्ये श्रद्धाला मृत्यूनंतर जन्नत मिळेल अशी स्टेटमेंट दिली. अशा लोकांसाठी गोळी हाच एकमेव मार्ग आणि शिक्षा आहे, सरकारी वेळ आणि पैसा वाया घालू नका अशा हरामखोरांसाठी. असं त्यांनी म्हटले आहे.