‘मरेपर्यंत माझी निष्ठा बाळासाहेबांच्या चरणाशीच राहिलं’; माजी आमदाराचा उद्धव ठाकरेंना शब्द

Mumbai – शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी यांनी मात्र आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहाणार असल्याचं सांगत शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले, की माझी निष्ठा बाळासाहेब यांच्या चरणाशी आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहील आणि कुठेही जाणार नाही.

मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर – लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करणार आहे. मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, असं साळवी यांनी स्पष्ट केलं. मात्र, पक्षप्रमुख जो उमेदवार देणार त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले.