रविश कुमार आहेत इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक, आकडा ऐकून फिरतील डोळे

Ravish Kumar Net Worth: रविश कुमार यांना कोण ओळखत नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्तमानातील ते सर्वात लोकप्रिय पत्रकारांपैकी एक आहेत. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यांवर लिहिलेल्या लेखांना वाचकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. रविश कुमार हे गोरगरिब आणि शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असतात. पण मित्रांनो, आपल्या निर्भीड पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेले रविश कुमार महिन्याला किती कमावतात?, त्यांची एकूण संपत्ती किती आहे?, याचा कधी तुम्ही विचार केलाय का?

तर या विशेष लेखात आपण पत्रकार रविश कुमार यांच्या संपत्तीबद्दल माहिती घेऊ…

रविश कुमार यांच्याबद्दल थोडंस…
रविश कुमार यांच्या संपत्तीकडे वळण्याआधी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ. रविश कुमार यांचा जन्म बिहारच्या चंपारण जिल्ह्यातला. त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पटनाच्या लोहिया महाविद्यालयात घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी दिल्लीची वाट धरली. दिल्लीतील दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान त्यांची भेट नयना दासगुप्ता यांच्याशी झाली आणि रविश कुमार यांनी नयना दासगुप्ता यांना आपली जीवनसंगिनी बनवले.

रविश कुमार हे गेल्या २२ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. NDTVचा अविभाज्य भाग बनले होते. NDTVमध्ये रविश कुमार अनेक कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करत होते. यांमध्ये आठवड्याचा शो हमलोग, रविश की रिपोर्ट, देश की बात आणि प्राईम टाईम या कार्यक्रमांचा समावेश होता. त्यांना दोनदा रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम अवॉर्ड आणि २०१९मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

रविश कुमार यांची संपत्ती
रविश कुमार यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, ते जगातील सर्वात श्रीमंत पत्रकारांमध्ये गणले जातात. माध्यमांतील काही वृत्तांनुसार, रविश कुमार दर महिन्याला २० लाखांपर्यंत कमावतात. तसेच दिल्ली येथे त्यांची बरीच प्रॉपर्टीही आहे. रविश कुमार यांच्या कार कलेक्शनमध्ये BMW, Mercedes सारख्या क्लासी गाड्याही आहेत. रविश कुमार यांच्या वर्षभरातील कमाईबद्दल सांगायचे झाल्यास हा आकडा जवळपास अडीच कोटी इतका आहे. caknowledge वेबसाइटनुसार, रविश कुमार यांचे एकूण नेट वर्थ १५८ कोटी रुपये इतके आहे.