कोकणच्या ढाण्या वाघाचं एक पाऊल मागे; देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्ती, राणेंची नाराजी दूर

Nilesh Rane : माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपला राजकीय निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे घेतला आहे. भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी आजच निलेश राणे यांची भेट घेऊन समजूत काढली होती.

रवींद्र चव्हाण यांच्यासोबतच्या मतभेदामुळे निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत निलेश राणे यांची चर्चा झाली. त्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी दोघांनी मिळून पुढील निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीसांनी दिल्या होत्या. त्यानुसार आता निलेश राणे यांनी आपला निर्णय बदलत, राजकारणात सक्रिय राहण्याची भूमिका घेतली आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी काल तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, निलेश राणे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील बैठकीनंतर निलेश राणे यांची नाराजी दूर झाली.

निलेश राणे यांनी बुधवारी एक ट्विट करत आपण अचानक राजकारणातून बाजूला होत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू होत्या. राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे निलेश राणे बाजूला होत असल्याची चर्चा होती. आज रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय 24 तासांमध्ये मागे घेतला.

रवींद्र चव्हाण निलेश राणेंची भेट घेतल्यानंतर म्हणाले, निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर नेमकं काय घडलं हे कळत नव्हतं. आम्ही याबाबत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. संघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांवर अनन्या होऊ नये ही सर्वांची भावना आहे.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल