IND vs AUS: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला, मालिकेत 3-1 अशी घेतली आघाडी

Ind vs Aus – टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिकेत 3-1 अशी अजेय आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ 154 धावा करू शकला. भारताकडून गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी न मिळालेल्या अक्षर पटेलने आज 3 विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. रवी बिश्नोईने पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियावर दडपण वाढवले अन् त्याचा फायदा पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरला (2 विकेट्स) उचलता आला.

भारताकडून रिंकू सिंगने 29 चेंडूत 46 धावा केल्या. जितेश शर्माने 35 धावांचे योगदान दिले. यशस्वी जैस्वालने 37 आणि ऋतुराज गायकवाडने 32 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेनने 4 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले. जेसन बेहरेनडॉर्फ आणि तनवीर संघाने 2-2 बळी घेतले. अॅरॉन हार्डीने एक विकेट घेतली.

महत्वाच्या बातम्या-

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

दक्षिण आफ्रिका दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी