Nilesh Rane यांचा राजकारणाला कायमचा जय महाराष्ट्र, ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय

Nilesh Rane Break From Politics: भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आज (२४ ऑक्टोबर) मोठा निर्णय घेत राजकीय क्षेत्रात खळबळ माजवली आहे. निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणाला कायमचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी स्वत: X या समाजमाध्यमातून यासंदर्भात घोषणा केली आहे.

मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही, असे म्हणत त्यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. BJP मध्ये खूप प्रेम भेटलं आणि BJP सारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे, अशा शब्दांत निलेश राणेंनी सर्वांचे आभारही व्यक्त केले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. भाजपासाठी हा मोठा धक्का असेल.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ