देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना रिटर्न गिफ्ट! नितेश राणेंनी ट्विट करत साधला निशाणा

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) 2019 च्या निवडणुकीवेळी म्हणाले अन् हा डायलॉग त्यांच्या नावासोबत कायमचा जोडला गेला. काहीवेळा हा डायलॉग त्यांच्या प्रगतीचं प्रतीक बनला तर कधी त्यांना याच डायलॉगवरून हिणवलं गेलं. पण त्यांचा हा डायलॉग सध्या खरा ठरताना दिसतोय. कारण राज्यात पुन्हा फडणवीस सरकार अस्तित्वात येईल अन् देवेंद्र पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी बसतील.

दरम्यान,भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विटच्या माध्यमातून शिवसेनेला (Shivsena) आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला तर त्याचाच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने घेतला असल्याचे (Nitesh Rane) नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नितेश राणे यांच्या या ट्विटची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होत आहे.