उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही – खोपकर

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजपच्या (BJP) गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यापूर्वी राज्यातील जनतेशी भावनिक संवाद साधला. या संवादानंतर उद्धव ठाकरे यांच्या बाजुने एक सहानुभूतीची लाट निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. राज्यभरातून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळत आहे. मात्र दुसरीकडे राजसाहेब (Raj Thackeray) यांच्याबद्दल सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा (MNS) महाराष्ट्र सैनिक (Maharashtra Sainik) म्हणून तिळमात्र सहानुभूती नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत पुन्हा एकदा शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला आहे.