गद्दारांना सोडणार नाही, माझे काम ठोकायचे आहे- नितीन नांदगावकर 

Mumbai –   एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान,  राज्यात राजकीय भूकंप घडवणाऱ्या शिवसेनेतील आजवरच्या सर्वात मोठ्या बंडानं ठाकरे सरकार

(Thackeray Gov) अडचणीत आलं आहे. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदार असल्याची चर्चा आहे. शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भूमिकाही आता समोर आली आहे. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे भाजपसोबत (BJP) जाण्यास हे नेते इच्छुक आहेत अशी भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.

यातच शिवसेनेचे नेते नितिन नांदगावकर (Nitin Nangaonkar) यांनी संताप व्यक्त केला आहे. गद्दारांना सोडणार नाही. माझे काम ठोकायचे आहे. याआधी समाजकंटकांना ठोकून काढत होतो. मात्र, आता मला असे वाटतेय की गद्दारांना चोपायची वेळ आली आहे. प्रेमाने परत या, नियमांचे पालन न केल्यास आमदारकी जाईल  अशी प्रतिक्रिया नितिन नांदगावकर यांनी दिली.