महाविकास आघाडीचा गोंधळ सुरूच; पटोले म्हणतात मुख्यमंत्र्यांना कोरोना, वडेट्टीवार म्हणतात लागण नाही 

Mumbai –   एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड अखेर यशस्वी झाल्यात जमा आहे. तब्बल ४६ आमदार शिंदेंनी आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार शेवटच्या घटका मोजत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) आज राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान,  राज्यात कोरोनावरुन गोंधळ दिसून येतोय. आधी राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, नाना पटोले म्हणतात मुख्यमंत्र्यांना कोरोना, तर विजय वडेट्टीवार म्हणतात लागण नाही, असा मतभेदही कोरोनावरुन दिसून येतोय.