Bacchu Kadu – इंग्रजाची दलाली करुन मिळवलेल्या मुंबई शहरातील ६००० एकर जमिनीची चौकशी करा

Mumbai – विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहात बोलताना आ. बच्चू कडु (Bacchu Kadu) यांनी मुंबईतल्या पारशी लोकाकडे असलेल्या जमिनीचा प्रश्न आज मांडला, आ. बच्चू कडु यांनी सवाल केला की, “भारताच्या इतिहासात दोन प्रकारे लोक श्रीमंत झाले. काही स्वकर्तृत्वाने तर काही अवैद्य धंदे व इंग्रजाची दलाली करुन. मुंबईत राहण्यालायक ३४,००० एकर जमीन आहे. यापैकी ५४३८ एकर जमीन फक्त ६ पारसी परिवारांकडे आहे. हि जमीन त्यांना इंग्रजाकडुन लिज अथवा भाडेतत्त्वावर वर देण्यात आली तर स्वातंत्र्यानंतर सरकारकडून ती परत का घेण्यात आली नाही?  ग्रामीण भागात सिलींगच्या कायद्याने अनेकाच्या जमिनी जप्त झाल्या परंतु शहरातील या जमिनी अद्यापही या परिवाराकडे आहे. याबाबत शासनाने चौकशी करावी ” अशी मागणी केली आहे.

मुंबईत असलेल्या ३४,००० एकर जमिनी पैकी ५४३८ एकर जमिन खालील पारसी परिवाराकडे आहे.

१. गोदरेज ३४०० एकर
२. F.E. दिनशॉ ट्रस्ट त्यांच्या कडे ६८३ एकर
३. जिजिभाई अरदेशक ट्रस्ट कडे ५०८ एकर
४. A. H. वाडिया ट्रस्ट कडे ३६१ एकर
५. बहिरामजि जिजिभाई ट्रस्ट कडे २६९ एकर
६. खिलजीभाई दिनशॉ विलमोरीया २०६ एकर जमीन
म्हणजे ३४,००० एकर मधील ६ पारसी परिवाराकडे ५४२८ एकर म्हणजे १५% जमीन आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

सदर जमिन ही इंग्रजाची दलाली करुन कश्या प्रकारे लिजवर मिळाली याचे पुरावे आ. बच्चू कडु यांनी सभागृहात सादर केले. ग्रामीण भागातील जमिनी सरकारने सिलींग कायद्या अंतर्गत जमा केल्या परंतु शहरातील या सरकारी जमिनी शासनाने जमा का केल्या नाही असा सवाल आ. बच्चू कडु यांनी उपस्थित केला.

१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्यत सदर जमनिचा चौकशी न झाल्यास या जमिनीचा ताबा बेघर, दिव्यांग, भिक्षुक लोकांना घेऊन देणार असा ईशारा आ. बच्चू कडु (Bacchu Kadu) यांनी सरकारला दिला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

विधिमंडळाच्या लॉबीत सत्ताधारी आमदारांची धक्काबुक्की महाराष्ट्राला लाज आणणारी: Nana Patole

Sambhaji Bhide: संभाजी भिडेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, काळे झेंडेही दाखवले

Muralidhar Mohol | मोहोळांनीही उघडले लोकसभेचे पत्ते; म्हणाले, ‘मी लोकसभेची तयारी करतोय, पण…’