उन्हाळ्यात नाकातून रक्त येते… घाबरू नका, लगेच करा हे घरगुती उपाय, मिळेल आराम

Nose Bleeding In Summer : कडक उन्हात नाकातून रक्त येण्याची समस्या अनेकदा होते. याबाबत निष्काळजीपणा दाखविल्यास ते गंभीर होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात नाकातून रक्त येण्याची समस्या होण्याचे कारण म्हणजे उन्हाळ्याच्या तापमानात नाकात कोरडेपणा असू शकतो. वास्तविक, नाकामध्ये अनेक प्रकारच्या रक्तवाहिन्या आढळतात, ज्या नाकाच्या पुढील आणि मागील पृष्ठभागाच्या अगदी जवळ असतात. जेव्हा नाक सुकते तेव्हा या रक्तवाहिन्या पसरतात. त्यामुळे रक्त येऊ लागते. ज्यांना सायनुसायटिसचा त्रास होतो त्यांच्यातही ही समस्या दिसून येते. चला जाणून घेऊया या समस्येचे कारण आणि त्यावरचे घरगुती उपाय.

जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हात जाल तेव्हा चेहरा झाका. नाकातून रक्त येण्याच्या समस्येवर मोहरीचे तेल उत्तम उपाय आहे. रात्री झोपताना कोमट मोहरीचे तेल दोन ते तीन थेंब नाकात टाकून झोपावे. हळूहळू समस्या संपेल. कांद्याचा रस आयुर्वेदात औषध म्हणूनही वापरला जातो. यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. आयुर्वेदानुसार कांद्याचा रस नाकात टाकल्याने नाकातून रक्त येण्यापासून आराम मिळतो. कांद्याच्या रसाचे २ ते ३ थेंब नाकात टाकावेत.

जर तुम्ही उन्हात बाहेर पडताच तुमच्या नाकातून अचानक रक्तस्त्राव सुरू झाला तर अस्वस्थ होण्याऐवजी तोंडाने दीर्घ श्वास घ्या. हळूहळू आराम मिळेल. नाकातून रक्त येणे थांबत नसेल तर बर्फाचा तुकडा कपड्यात गुंडाळून नाकाला लावावा. त्यामुळे लवकरच दिलासा मिळेल.

सूचना : या लेखात नमूद केलेल्या सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.