… तर अजित पवार असू शकतात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार?

Ajit Pawar Role In NCP : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (10 जून) एक मोठे पाऊल उचलले आणि सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष केले. यानंतर त्यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी मोठी भूमिका बजावावी, अशी राष्ट्रवादीची इच्छा असल्याच्या बातम्या आता येत आहेत.

टाईम्स ऑफ इंडियाच्या मते, त्यांनी राज्यात मोठी भूमिका बजावावी आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तसेच विधानसभा निवडणुकांमध्ये MVA चा विजय सुनिश्चित करावा अशी पक्षाची इच्छा आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्या तर पक्ष अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवू शकतो.

यापूर्वी अजित पवार यांनीही नाराजीचे वृत्त फेटाळून लावले होते. आपण विरोधी पक्षनेतेही असल्याने राज्याच्या मोठ्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत, असे ते म्हणाले. राज्याच्या राजकारणात सक्रिय असून पक्षाने आपल्याला कोणतीही जबाबदारी दिली नाही, असे म्हणणाऱ्यांना पक्षानेच आपल्याला विरोधी पक्षनेतेपद दिले आहे, याचा विसर पडत असल्याचे ते म्हणाले.