अजितदादांना बोलू न देणे हे भाजपच्या संकुचित मनोवृत्ती लक्षण आहे – चाकणकर

पुणे – देहूतल्या संत तुकाराम मंदिराच्या शिळेच्या लोकार्पण सोहळा (Dedication ceremony of stone of Saint Tukaram temple at Dehut) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते झाला. प्रोटोकॉलप्रमाणे अजित पवारांना (Ajit Pawar) पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं बंधनकारक आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. पण त्यांना बोलू दिलं नाही.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांचे भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकांनी थेट पंतप्रधानांचे नाव पुकारलं. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावं असं सांगितलं. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नाही.

दरम्यान, या घडामोडींवर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (State Women’s Commission Chairperson Rupali Chakankar) यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, मागील काही वर्षांपूर्वी झालेल्या पुणे मनपाच्या कार्यक्रमात साहेबांना निमंत्रण नसणे आणि आज देहू येथील कार्यक्रमात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री मा.अजितदादांना बोलू न देणे ही भाजपच्या संकुचित मनोवृत्ती लक्षण आहे. राज्य अथवा केंद्र सरकारमध्ये अति महत्वाच्या व्यक्तींना दिला जाणारा मान यासाठी राज शिष्टाचार नावाचं खाते आपल्याकडे आहे.त्या राजशिष्टाचारांच्या नियमांना पायदळी तुडवण्याचे काम भाजप सरकार (BJP government) वेळोवेळी करत आले आहे. असं चाकणकर यांनी म्हटले आहे.