‘जर तुम्ही भारताला हरवले तर मी…’, पाकिस्तानी अभिनेत्रीची बांगलादेशच्या संघाला खुली ऑफर

Sehar Shinwari On IND vs BAN: गेल्या शनिवारी (14 ऑक्टोबर) एकदिवसीय विश्वचषक 2023मध्ये (ODI World Cup 2023) भारताविरुद्ध पाकिस्तानला (India vs Pakistan) दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव केला होता. या पराभवानंतर अभिनेत्री सेहेर शिनवारीसह (Pakistani Actress Sehar Shinwari) पाकिस्तानी बरेच निराश झाले. आता भारतीय संघाला हरवण्यासाठी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशी खेळाडूंना मोठी ऑफर दिली आहे.

टीम इंडिया गुरूवार, 19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील चौथा सामना खेळत आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी अभिनेत्रीने बांगलादेशच्या खेळाडूंना तिच्या माध्यमातून ऑफर दिली होती.

 

भारताविरुद्ध पाकिस्तानच्या पराभवाच्या दुसऱ्या दिवशी (15 ऑक्टोबर) पाकिस्तानी अभिनेत्रीने लिहिले, “इंशाअल्लाह माझे बंगाली मित्र पुढच्या सामन्यात आमच्याकडून बदला घेतील. जर त्यांचा संघ भारताला पराभूत करण्यात यशस्वी झाला तर मी ढाक्याला जाईन आणि बंगालच्या क्रिकेट संघासोबत फिश डिनर डेट करेन.

https://youtu.be/tr2tvuJfQq4?si=M8a1sEkkAwwC09hl

महत्वाच्या बातम्या-

सत्य विरुद्ध सत्ता च्या लढाईसाठी राष्ट्रवादी सज्ज; शरद पवारांनी घेतला सात लोकसभा मतदार संघाचा आढावा

ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा