ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत केले पलायन ?

Lalit Patil – दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरु इथून अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अमली पदार्थ तस्करी (Drug trafficking) प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तिकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून (Nashik News) अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातून फरारी होत नाशिकमध्ये मुक्कामी राहिलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला एका महिलेने मदत केल्याची माहिती समोर येत आहे. तिला भूषण पाटील याने दिलेले २५ लाख रुपये घेऊन ललितने पुढे पलायन केले. तिच्या घरातून नाशिक पोलिसांनी सात किलो चांदीही हस्तगत केली आहे.

ललित हा पंचवटी परिसरातील ज्या महिलेच्या घरी मुक्कामी होता तिचा व त्याचा नेमका काय संबंध आहे, भूषण याने तिच्याकडे कोठून पैसे आणून दिले यासंदर्भात पोलिस तपास करीत आहेत. ललितने सात किलो चांदी न नेता फक्त पंचवीस लाख रुपयांची रोख रक्कम नेत पुढे पलायन केल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली. त्यामुळे ललित, भूषण यांच्या पलायनात नाशिकच्या महिलेचा हात व फंडिंग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.महाराष्ट्र टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

https://www.youtube.com/watch?v=sm4extyXE9I

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा दोघींवर आरोप