काय सांगता !नितीन गडकरी यूट्यूबच्या माध्यमातून कमावतात महिन्यांकाठी चार लाख रुपये

नितीन गडकरी देखील आहेत प्रसिद्ध यूट्यूबर, दर महिन्याला कमावतात लाखों रुपये

नितीन गडकरी म्हणजे भारताचे रोड मेकर किंग आहेत. अतिशय हुशार आणि दिलदार मनाचे गडकरी नेहमी चर्चेत असतात. गडकरीची खरी ओळख त्यांच्या जलद आणि उत्तम कामासाठी आहे. केंद्रात कोणी काहीही करू गडकरी मात्र रस्ते बांधण्याचे अनेक विक्रम स्वताच्या नावावर करत आहेत. गडकरी त्यांच्या कामाच्या स्टाइलमुळे सामान्य जनतेमध्ये प्रसिद्ध आहेत. गडकरी एक प्रसिद्धी आणि महत्वाचे मंत्री असले तरी ते एक प्रसिद्ध यूट्यूबर देखील आहेत.

गडकरी महिन्याकाठी यूट्यूबच्या माध्यमातून 4 लाख रुपये कमवतात. गडकरी यांनी  लॉकडाऊन काळात नवीन व्यवसाय केला आहे. गडकरी यांनी एका कार्यक्रमात त्यांना यूट्यूबद्वारे कसे चार लाख रुपये मिळतात हे सांगितले. गडकरी म्हणतात मला लॉकडाऊन काळात एक वेगळाच छंद जडला होता. मी यूट्यूबवर नवीन- नवीन रेसिपी पाहून त्या बनवत . यातूनच मला यूट्यूब चॅनल काढावा अशी कल्पना सुचली. मी एक चॅनल सुरू केला आणि त्यावर माझ्या वेगवेगळ्या परिषदा, सभा, कार्यक्रम यांचे विडियो टाकण्यास सुरुवात केली. लोकांना देखील विडियो आवडू लागले. मग माझे सबक्राईबर वाढू लागले. माझे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाले. त्या विडियोना जाहिराती सुरू झाल्या आणि  त्यातून उत्पन्न सुरू झाले.

गडकरी महिन्यांकाठी यूट्यूबमाध्यमातून चार लाख रुपये कमावत आहेत. लॉकडाऊन काळात गडकरी यांनी भारतासह अनेक इतर देशांतील विद्यार्थ्यांना लेक्चर दिले. त्यांनी लेक्चर दिलेले 900 हून अधिक लेक्चर त्यांनी यूट्यूबवर अपलोड केले आहेत. गडकरी म्हणातात पैसे कमावणे हा माझा मुळात हेतु नव्हता पण चेष्टेत सुरू केलेले यूट्यूब चॅनल आता चांगले पैसे कमावून देत आहेत. नितीन गडकरी यांचे यूट्यूबवर तीन लाख सबक्राईबर  आहेत.