शरद पवार सुप्रिया सुळे यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील – सरमा

Israel Palestine Issue: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, या मुद्द्यावरून भारतात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पॅलेस्टाईनबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ते म्हणाले, ‘मला वाटते शरद पवार साहेब सुप्रिया सुळे मॅडम यांना हमासच्या बाजूने लढण्यासाठी गाझाला पाठवतील.’

सरमा यांचे हे विधान शरद पवार यांच्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून होते ज्यात ते म्हणाले होते की, ‘आपण पॅलेस्टाईनच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, ती संपूर्ण जमीन पॅलेस्टाईनची आहे आणि इस्रायलने येऊन त्या जमिनीवर कब्जा केला आहे, त्यांची घरे ताब्यात घेतली आहेत. इस्त्रायली तिथे बाहेरचे आहेत आणि प्रत्यक्षात ही जमीन इस्रायलची आहे. ते पुढे म्हणाले, ‘या जमिनीच्या मालकीच्या लोकांच्या पाठीशी राष्ट्रवादी उभी आहे.’

अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले, इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत भारताच्या भूमिकेवर शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते असे बेताल वक्तव्य करतात तेव्हा मला खूप वाईट वाटते. पियुष गोयल यांनीही X करत शरद पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, पवार साहेब सुद्धा त्या सरकारचा भाग होते, बाटला हाऊस चकमकीत अश्रू ढाळले होते आणि भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ते झोपले होते.

https://www.youtube.com/watch?v=52bkac9xyp8

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना अटक, पळून जाण्यास मदत केल्याचा दोघींवर आरोप