ओडिशातील रेल्वे अपघातामागचं नेमकं कारण आणि जबाबदार लोक यांचा शोध लागला

या बाबतचा अहवाल मिळाला असून, तो सार्वजनिक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल

नवी दिल्ली – ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातामागचं नेमकं कारण आणि जबाबदार लोक यांचा शोध लागला असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी डीडी न्यूजशी बोलताना सांगितलं. या बाबतचा अहवाल मिळाला असून, तो सार्वजनिक करण्यापूर्वी त्याचा अभ्यास केला जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांना सांगितलं.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, भुवनेश्वर इथं पोहोचले असून, जखमींना पुरविण्यात येणाऱ्या वैद्यकीय मदतीचा आढावा घेणार आहेत. भुवनेश्वर इथल्या एम्स रुग्णालयाला आणि कटकमधील एससीबी मेडिकल कॉलेजला ते भेट देणार आहेत.