Breaking :  पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

Pune – पुण्यात राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Former Higher and Technical Education Minister Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार यावेळी शिवसैनिकांकडून ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली.  पुण्याच्या कात्रज परिसररात ही घटना घडली आहे.(shiv sainik attacked on rebel eknath shinde group mla uday samant van at pune)

सामंत शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या घराच्या दिशेने जात होते. यावेळेस त्यांचा गाड्यांचा ताफा हा सिग्नलवर थांबलेला. यावेळेस इतर 2-3  गाड्यांमधून 20-25  जण आले. या हल्लेखोरांनी मला शिवीगाळ केली. यानंतर सामंतांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी या हल्लेखोरांना हटकलं. तेव्हा या हल्लेखोरांनी हॉकी स्टीकने गाडीच्या मागील बाजूने हल्ला केला. सामंतावंर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.(attack on uday samant)

या सर्व दरम्यान सिग्नल सुटला. सिग्नल सुटला नाहीतर, माझ्यावरही हल्ला झाला असता, अशी भितीही सामंतांनी व्यक्त केली. सामंतांनी शिवसेनेसोबत गद्दारी केल्यानं हा हल्ला करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. लक्षात घेण्यासारखी बाब अशी की जिथे हा हल्ला झाला, तिथपासून 500 मीटर अंतरावर आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा सुरु होती.